मुंबई- बीसीसीआय वनडे लीगसाठी सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला मुंबईच्या अंडर-२३ संघात स्थान देण्यात आले आहे. ही लीग स्पर्धा १३ फेब्रुवारीपासून खेळली जाणार आहे. मुंबईच्या अंडर-२३ संघाचे नेतृत्व हे जय बिस्तकडे असणार आहे. मुंबईचा पहिला सामना पंजाबशी १४ फेब्रुवारीला जयपूर येथे होणार आहे
यापूर्वी अर्जूनने विनू मांकड अंडर १९, कूचबिहार करंडक, अंडर-१९ केसी महिंद्रा शील्ड आणि डी. वाय. पाटील टी२० स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याच जोरावर त्याला मुंबईच्या अंडर-२३ संघात स्थान देण्यात आले आहे.
अर्जूनच अष्टपैलू खेळाडू म्हणून मुंबईच्या अंडर-२३ संघात निवड करण्यात आली आहे. अर्जून हा मिचेल स्टार्क आणि बेन स्टोक्सला आपले रोल मॅाडेल मानतो. क्रिकेटच्या देवाचा 'पुत्र' बीसीसीआयच्या वनडे लीगमध्ये कशी कामगिरी करतो, याकडे आता सर्व क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून आहे.
बीसीसीआयच्या वनडे लीगसाठी अर्जुनची तेंडुलकरची मुंबईच्या अंडर-२३ संघात निवड - BCCI
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला मुंबईच्या अंडर-२३ संघात स्थान

Arjun Tendulkar
असा असेल मुंबई अंडर-२३ संघ
जय बिश्त (कर्णधार), हार्दिक तोमरे (यष्टीरक्षक), सुवेद पार्कर, चिन्मय सुतार, सिद्धार्थ अक्रे, कर्श कोठारी, तनुष कोटियान, अकिब कुरैशी, अर्जुन तेंडुलकर, अंजदीप लाड, क्रुतिक हानागवडी, आकाश आनंद, अमन खान, अथर्व अंकोलेकर, साईराज पाटिल.