मुंबई - मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने खेळल्या जाणाऱ्या मुंबई टी-२० लीग स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. या हंगामात ८ संघांचा समावेश असून या लीगचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळण्यात आला.
मुंबई टी-२० लीग स्पर्धेला आजपासून सुरुवात, पहिल्याच सामन्याच अर्जुन तेंडुलकर चमकला - Triumphs Knights MNE
अर्जुन तेंडुलकरला एमडब्लूएस संघाने ५ लाखांची बोली लावत आपल्या संघात दाखल करुन घेतले आहे
![मुंबई टी-२० लीग स्पर्धेला आजपासून सुरुवात, पहिल्याच सामन्याच अर्जुन तेंडुलकर चमकला](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3282370-233-3282370-1557848930255.jpg)
अर्जुन तेंडुलकर
लीगच्या सलामीच्या सामन्यात आकाश टायगर्स एमडब्लूए संघाने ट्रम्फ नाईट मुंबई नॉर्थ ईस्ट संघावर ५ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने एमडब्लूए संघाकडून खेळताना अष्टपैलू कामगिरी केली. प्रथम गोलंदाजी करताना अर्जुनने १ बळी घेतला तर फलंदाजीत १ षटकार आणि १ चौकार लगावत १९ चेंडूत २३ धावांची खेळी केली.
या लीगमध्ये अर्जुन तेंडुलकर आकाश टायगर्स एमडब्लूएस या संघाकडून खेळत असून त्याला एमडब्लूएस संघाने ५ लाखांची बोली लावत आपल्या संघात दाखल करुन घेतले आहे.