नवी दिल्ली - इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चर गेल्या काही दिवसांपासून त्याच्या जुन्या ट्विट्समुळे चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. त्याचे २०१४मधील एक ट्विट व्हायरल होत आहे. हे ट्विट म्हणजे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल म्हणून पाहिले जात आहे.
जोफ्रा आर्चरने केली होती बायडेन यांच्या विजयाची भविष्यवाणी! - जोफ्रा आर्चर व्हायरल ट्विट
नुकत्याच झालेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवणुकीमध्ये डोनाल्ड्र ट्रम्प यांना पराभवाचा सामना करावा लागला. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत केले. या निकालानंतर आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाने जोफ्रो आर्चरचे एक ट्विट रिट्विट केले आहे.
नुकत्याच झालेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवणुकीमध्ये डोनाल्ड्र ट्रम्प यांना पराभवाचा सामना करावा लागला. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत केले. या निकालानंतर आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाने जोफ्रो आर्चरचे एक ट्विट रिट्विट केले आहे. त्यात फक्त 'जो' असे लिहिलेले आहे. हे ट्विट सध्या खूप व्हायरल होत आहे.
यापूर्वी, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी चाहत्यांना एक गोड बातमी दिली. अनुष्का शर्मा गर्भवती असून पुढच्या वर्षी जानेवारीत आम्ही पालक होऊ, असे विराटने सांगितले होते. या बातमीनंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे ५ वर्षांपूर्वीचे एक ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. या ट्विटमध्ये ''जानेवारी ५'' असा उल्लेख करण्यात आला आहे. या दिवशी विराट आणि अनुष्काच्या घरी नवा पाहुणा येऊ शकतो, अशी चर्चा या ट्विटद्वारे नेटकऱ्यांमध्ये रंगली होती.