मुंबई - कोरोनामुळे सद्या जगभरातील सर्व क्रीडा स्पर्धा ठप्प आहेत. अशात सर्व खेळाडू आपापल्या घरीच कुटुंबीयांसोबत क्वालिटी टाइम घालवत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीही सध्या घरीच आहे. विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत विराट डायनॉसरची अॅक्टिंग करताना पाहायला मिळत आहे.
अनुष्काने शेअर केलेल्या व्हिडिओ विराट डायनॉसोरची अॅक्टिंग करत घरात येताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अनुष्काने मला डायनोसर दिसला असे म्हटलं आहे.
विराट आणि अनुष्का २०१३पासून एकमेकांना डेट करत होते. पण लग्नापूर्वी दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल खुलून चर्चा केली नाही. ११ डिसेंबर २०१७मध्ये इटलीत राजेशाही थाटात अनुष्का-विराट हे विवाहबद्ध झाले. दोघांनी आपलं लग्न कोणाला कळू नये याची पूर्ण काळजी घेतली होती. पण तरीही त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाले होते.