मुंबई - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासह घरातच क्वालिटी टाईम घालवत आहे. भलेही दोघे कुठेही असले, तरी ते सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. अनुष्काने काही तासांपूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. त्यात दोघेही वेडेवाकडे तोंड करून वाकुल्या दाखवताना दिसत आहेत. या फोटोला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.
फोटोसोबत अनुष्काने, सर्व गोष्टींपासून विभक्त होऊन स्वतःला घरात बंद केल्यामुळे, तुम्हाला एकदुसऱ्याकडून खूप प्रेम मिळतं. असे मजेशीर कॅप्शन दिलं आहे. अनुष्काच्या या फोटाला भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे.