मुंबई -आयपीएलचा 'महासंग्राम' आता अंतिम टप्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज गोलंदाज आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी आयपीएलमधील आपला ११ खेळाडूंचा 'ड्रीम इलेव्हन' संघ निवडला आहे.
कुंबळें यांनी आपल्या 'ड्रीम इलेव्हन' संघात भारतीय वनडे संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांना स्थान दिलेले नाही. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने यंदा अंतिम फेरी गाठली आहे. असे असूनही रोहितला कुंबळे यांनी आपल्या ड्रीम इलेव्हनमध्ये स्थान न दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.