महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'धोनीला, सन्मानपूर्वक निवृत्ती मिळायला हवी, तो त्याचा हक्क आहे' - महेंद्रसिंह धोनी विषयी बातमी

एका मुलाखतीदरम्यान, कुंबळे म्हणाले की, 'महेंद्रसिंह धोनीने खेळावे की नाही याबद्दल मी काही सांगू शकत नाही. मात्र, यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून ऋषभ पंतने टी-२० संघासाठी आपली दावेदारी मजबूत केली आहे. यामुळे धोनीबद्दलचा निर्णय आता एम. के. प्रसाद यांच्या निवड समितीला घ्यावा लागणार आहे. परंतु, धोनीला सन्मानपूर्वक निवृत्ती मिळायला हवी, तो त्याचा हक्क आहे.'

'धोनीला, सन्मानपूर्वक निवृत्ती मिळायला हवी, तो त्याचा हक्क आहे'

By

Published : Sep 8, 2019, 5:06 PM IST

मुंबई - इंग्लंडमध्ये पार पडलेल्या आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेतील पराभवानंतर भारतीय खेळाडू महेंद्रसिंह धोनीने निवृत्ती घ्यायला हवी, असे मत व्यक्त करण्यात येत होते. याविषयावर आता भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबले यांनी भाष्य केले आहे.

एका मुलाखतीदरम्यान, कुंबळे म्हणाले की, 'महेंद्रसिंह धोनीने खेळावे की नाही याबद्दल मी काही सांगू शकत नाही. मात्र, यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून ऋषभ पंतने टी-२० संघासाठी आपली दावेदारी मजबूत केली आहे. यामुळे धोनीबद्दलचा निर्णय आता एम. के. प्रसाद यांच्या निवड समितीला घ्यावा लागणार आहे. परंतु, धोनीला सन्मानपूर्वक निवृत्ती मिळायला हवी, तो त्याचा हक्क आहे.'

पुढे बोलताना कुंबळे म्हणाले की, निवड समितीने महेंद्र सिंह धोनीशी निवृत्तीबद्दल चर्चा करावी, असही त्यांनी सांगितलं. दरम्यान, भारतीय संघाला विश्वकरंडक स्पर्धेमध्ये उपांत्य सामन्यामधून बाहेर पडावे लागले होते. यानंतर धोनी क्रिकेटपासून दूर असून त्याने दोन महिने विश्रांती घेतली आहे. वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून त्याने माघार घेतली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details