मुंबई -यंदाची आयसीसी विश्वकरंडक स्पर्धा लक्षात राहिली ती अंतिम सामन्यात झालेल्या थरारक सुपरओव्हरमुळे. चौकार-षटकाराच्या नियमावर इंग्लंडने पहिल्या विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. या विजयावर आणि नियमावर समाजमाध्यमांमध्ये वेगवेगळी मते उमटली. याच चौकार-षटकाराच्या नियमासाठी भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेला पाचारण केले आहे. त्याच्या अध्यक्षतेखाली आयसीसीची क्रिकेट समिती एकदिवसीय क्रिकेटमधील टायब्रेकरबाबत निर्णय घेणार आहे.
चौकार-षटकाराच्या 'त्या' नियमासाठी कुंबळेला केले पाचारण, पुढील बैठकीत होणार चर्चा
ही समिती आपल्या पुढील बैठकीत विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यानंतर उद्भवलेल्या समस्यांवर चर्चा करणार आहे.
ही समिती आपल्या पुढील बैठकीत विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यानंतर उद्भवलेल्या समस्यांवर चर्चा करणार आहे. या बैठकीची माहिती, आयसीसीचे महाव्यवस्थापक जेफ अॅलडाईस यांनी एका मुलाखतीमध्ये दिली आहे. इंग्लंडला या नियमाच्या आधारे विजेता घोषित करण्यात आल्याने आयसीसीवर खूप टीका झाली होती.
जेफ यांनी सुपरओव्हरच्या वापराबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, 'आयसीसीच्या स्पर्धेत सामना बरोबरीत सुटल्यानंतर निकालाचा निर्णय देण्यासाठी २००९ पासून सुपर ओव्हरचा वापर करण्यात येत आहे. आणि सुपर ओव्हरनंतरही सामना बरोबरीत सुटल्यास सर्वाधिक चौकार-षटकार लागवणार्या संघालाच विजयी घोषित करण्यात येते. जवळपास सर्व टी-२० स्पर्धेत हा नियम वापरला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही व्यावसायिक स्तरावरचे नियम वापरण्यावर आमचा भर आहे.'