महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

अनिल कुंबळेंचा विश्वचषकासाठी १५ खेळाडूंचा संभाव्य भारतीय संघ - TEAM

या संघात कुंबळे यांनी लोकेश राहूल आणि दिनेश कार्तीक यांना स्थान दिले नाही.

Anil Kumble

By

Published : Mar 16, 2019, 11:46 PM IST

मुंबई - आयसीसी विश्वचषक स्पर्धेला आता २ महिन्याचा काळ बाकी राहिला आहे. त्या पार्श्वभूमीवर क्रिकेटविश्वातल्या अनेक दिग्गजांनी विश्वचषक कोण पटकावणार, स्पर्धेत कोणता खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करणार याबाबत आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. काहींनी तर त्यांचे संभाव्य संघही जाहीर केले आहेत.

भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज गोलंदाज आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी विश्वचषकासाठी आपला १५ खेळाडूंचा संभाव्य भारतीय संघ निवडला आहे.एका संकेतस्थळाशी बोलताना कुंबळे म्हणाले की, या १५ खेळाडूंमधील अंतिम ११ मध्ये रोहित, शिखर, विराट, धोनी, केदार, हार्दिक, भुवनेश्वर, युजवेंद्र, कुलदीप, शमी आणि बुमराह हे खेळाडू असतील.

अनिल कुंबळेचा विश्वचषक २०१९ साठीचा संभाव्य संघ

विराट कोहली (कर्णधार), महेंद्र सिंह धोनी (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, शिखर धवन, केदार जाधव, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, खलील अहमद, अंबाती रायडू, रिषभ पंत आणि विजय शंकर.


For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details