महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विंडीजला मोठा धक्का! अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल पहिल्या दोन टी-२० सामन्यांना मुकणार - टीम इंडिया

रसेलच्या जागी जेसन मोहम्मदला संघात स्थान देण्यात आले आहे.

विंडीजला मोठा धक्का! अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल पहिल्या दोन टी-२० सामन्यांना मुकणार

By

Published : Aug 3, 2019, 12:19 PM IST

नवी दिल्ली - आजपासून भारत आणि वेस्ट इंडिज मालिकेला सुरुवात होत आहे. आज फ्लोरिडाच्या सेंट्रल ब्रोवार्ड रिजनल पार्कवर पहिला टी-२० सामना रंगणार असून तो ८ वाजता सुरू होईल. मात्र, सामन्यापूर्वीच विंडीजला मोठा धक्का बसला आहे.

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज आणि अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल दुखापतीमुळे पहिल्या दोन टी-२० सामन्यांना मुकणार आहे. त्याच्या जागी जेसन मोहम्मदला संघात स्थान देण्यात आले आहे. जेसनने विंडीजसाठी नऊ टी-२० खेळले आहेत आणि एकदिवसीय आणि टी-२० संघामध्ये कर्णधार पदाची धूराही सांभाळली आहे.

आंद्रे रसेलच्या गुडघ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली होती. कॅनडात खेळल्या जाणाऱ्या जीटी-20 लीगमध्ये त्रास जाणवायला लागल्यामुळे रसेलने भारताविरुद्ध मालिकेमधून माघार घेतली आहे.

भारतीय संघ -

  • विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कुणाल पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.


वेस्ट इंडिजचा संघ -

  • कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), जॉन कॅम्पबेल, इविन लुइस, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन, किरॉन पोलार्ड, रोव्हमन पॉवेल, कीमो पॉल, सुनील नरिन, शेल्डन कॉट्रेल, ओशाने थॉमस, अँथनी ब्रॅम्बल, जेसन मोहम्मद, खारी पाएरे.

ABOUT THE AUTHOR

...view details