किंग्सटन- वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल लवकरच 'बाप' बनणार आहे. ही आनंदाची बातमी खुद्द रसेल याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दिली आहे. रसेलची पत्नी सुपरमॉडेल जेरिम लोरा गर्भवती आहे.
हेही वाचा -टी-20 क्रिकेटमधे नवीन करिश्मा; 'या' दोन फलंदाजांनी सलग 7 चेंडूत ठोकले 7 षटकार
रसेलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोमध्ये रसेल आणि त्याची पत्नी लोरा दोघे दिसत आहेत. रसेल दाम्पंत्याने पांढरा आऊटफीट्स परिधान केला असून यात ते खूप सुंदर दिसत आहेत. तसेच फोटोच्या बॅकग्राऊंडला फुगे आणि फुले दिसत आहेत.
हेही वाचा -अनुष्काने टिपले विराटच्या चेहऱ्यावरचे हावभाव, पाहा फोटो
दरम्यान, रसेल याने या फोटोसोबत एक व्हिडिओही शेअर केला असून यात दोघे धम्माल क्रिकेट खेळताना दिसत आहेत. व्हिडिओत आंद्रे फलंदाजी करताना दिसत आहे. तर लोरा गोलंदाजी करत आहे.