नवी दिल्ली - बांगलादेश विरुध्दच्या कसोटी मालिकेत २-० ने निर्भेळ यश संपादन केल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने एक खुलासा केला आहे. त्याने भारताचा एक असा खेळाडू आहे. ज्याला धावण्यात मागे टाकणं असंभव असल्याचे सांगितलं. विराटच्या मते अष्टपैलू रवींद्र जडेजाला धावण्यात हरवणं असंभव आहे.
विराटने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत विराटसोबत रवींद्र जडेजा आणि ऋषभ पंत धावताना दिसत आहेत. विराटने या फोटोला मजेशीर कॅप्शनही दिले आहे.
त्या कॅप्शनमध्ये विराट म्हणतो, 'आम्हाला ग्रुप सराव करायला आवडतं. पण या सरावात जडेजाला मागे टाकणं सोपं नाही.'