सिडनी -आयपीएल स्पर्धेला विश्वकरंडक स्पर्धेपेक्षा जास्त प्राधान्य देऊ नये, असे ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अॅलन बॉर्डर यांनी म्हटले आहे. आयपीएलची सुरुवात 29 मार्च रोजी होणार होती. परंतु कोरोन व्हायरसमुळे ही स्पर्धा प्रथम 15 एप्रिल आणि त्यानंतर अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली.
आयपीएलला वर्ल्डकपपेक्षा जास्त प्राधान्य देऊ नये - बॉर्डर - ipl and wc news
बीसीसीआय आयपीएलचे आयोजन सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान करण्याचा विचार करत आहे. पण यावेळी ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वकरंडक स्पर्धाही होणार आहे. बॉर्डर म्हणाले, "स्थानिक स्पर्धेपेक्षा वर्ल्डकपला पसंती दिली पाहिजे. त्यामुळे टी-20 विश्वकरंडक स्पर्धा असेल तर आयपीएल होणार नाही, असे मला वाटते. वर्ल्डकप किंवा आयपीएल या निर्णयावर मी प्रश्न उपस्थित करेन. "
![आयपीएलला वर्ल्डकपपेक्षा जास्त प्राधान्य देऊ नये - बॉर्डर allan border view on ipl and t20 world cup preference](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7311285-thumbnail-3x2-allan.jpg)
सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान आयपीएलचे आयोजनकरण्याचा विचार बीसीसीआयकरीत आहे. पण यावेळी ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वकरंडक स्पर्धाही होणार आहे. बॉर्डर म्हणाले, "मला यातून आनंद नाही. स्थानिक स्पर्धेपेक्षा वर्ल्ड कपला पसंती दिली पाहिजे. त्यामुळे टी-20 विश्वकरंडक स्पर्धा असेल तर आयपीएल होणार नाही, असे मला वाटते. वर्ल्डकप किंवा आयपीएलय या निर्णयावर मी प्रश्न उपस्थित करेन. "
विश्वकरंडक स्पर्धेपेक्षा आयपीएलला प्राधान्य मिळाल्यास ते एक वाईट उदाहरण ठरेल, असे बॉर्डर म्हणाले. "भारत हा खेळ चालवत आहे. तसे झाल्यास घरगुती मंडळाने त्यांच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये भाग घेण्यापासून रोखले पाहिजे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने मनमानी करावी, असे मला वाटत नाही. हा चुकीचा मार्ग असेल."