हैदराबाद - भल्या भल्या फलंदाजांना आपल्या फिरकीवर नाचवणाऱ्या अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा अव्वल खेळाडू राशिद खानवर नवी जबाबदारी आली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने राशिदला कर्णधारपद दिले आहे.
फिरकीचा जादूगार राशिद खान अफगाणिस्तानचा नवा शिलेदार! - Asghar Afghan
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने राशिदला कर्णधारपद दिले आहे.

राशिद खान आता अफगाणिस्तानच्या तीनही संघाचा म्हणजे कसोटी, एकदिवसीय आणि टी- २० संघाचा कर्णधार असेल. अष्टपैलू खेळाडू गुलाब्दिन नैब हा विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघाचा कर्णधार होता. मात्र त्याला आता पायउतार करत बोर्डाने राशिदला कर्णधारपद बहाल केले आहे. तर, उपकर्णधार म्हणून माजी कर्णधार असगर अफगाणला नेमले आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन अझीझुल्ला फझली यांनी नव्या कर्णधाराची आणि उपकर्णधाराची घोषणा केली. याआधी, विश्वकरंडक स्पर्धेसाठी असगर अफगाणला हटवून गुलाब्दिन नैबला कर्णधार केले होते. नैबच्या कर्णधारपदावरुन संघामध्ये नाराजी पसरली होती.