मुंबई - तब्बल ५ महिन्यांच्या विश्रांतीनंतर भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या डी. वाय. पाटील टी-२० स्पर्धेतून क्रिकेटच्या मैदानात परतणार आहे. हार्दिकच्या पाठीवर काही महिन्यांपूर्वी लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सध्या त्याच्यावर बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत बीसीसीआयचे डॉक्टर आणि फिजीओ यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
तब्बल ५ महिन्यानंतर हार्दिक पांड्या खेळणार क्रिकेटचा सामना - हार्दिक पांड्या डी.वाय.पाटील टी-२० स्पर्धा न्यूज
हार्दिक व्यतिरिक्त भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवनही डी. वाय. पाटील टी-२० स्पर्धेतून क्रिकेटच्या मैदानात परतणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत धवनच्या खांद्याला दुखापत झाली होती, तर हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतर भुवनेश्वर संघातून बाहेर पडला होता.
हार्दिक व्यतिरिक्त भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवनही या स्पर्धेत भाग घेतील. गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत धवनच्या खांद्याला दुखापत झाली होती, तर हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतर भुवनेश्वर संघातून बाहेर पडला होता. या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होत असून यामध्ये सीएजी, आयकर, बँक ऑफ बडोदा आणि आरबीएल यांचा समावेश आहे. ६ मार्चला अंतिम सामना खेळवला जाईल.
हार्दिक पांड्याला आशिया चषकादरम्यान पाठीला दुखापत झाली होती. तो त्यानंतरही काही मालिकांमध्ये खेळला. मात्र, २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत पांड्याची दुखापत पुन्हा उफाळून आली आणि तो संघाबाहेर गेला.
'हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन यांच्याशिवाय अनामोलप्रीत सिंगही रिलायन्स-१ संघात खेळणार आहेत', असे डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांनी म्हटले आहे. मनीष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, संजू सॅमसन पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) संघाचा भाग असतील. याशिवाय सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी आणि दिव्यांश सक्सेना हेदेखील या संघातून खेळतील. त्याचबरोबर दिनेश कार्तिक, मनदीप सिंग, राहुल तेवतिया, वरुण चक्रवर्ती, ऋतुराज गायकवाड डी.वाय. पाटील-अ संघात सहभागी होतील.