नवी दिल्ली -इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) संपल्यानंतर सुरू होणारा भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा वादात सापडला आहे. या दौर्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संभाव्य कार्यक्रम जाहीर केला. मात्र, ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अॅलन बॉर्डर यांनी आपल्या क्रिकेट बोर्डाला फटकारले आहे.
बॉर्डर म्हणाले, ''सिडनी कसोटीतील बदलांपुढे देशाच्या क्रिकेट मंडळाने झुकू नये.'' सिडनी कसोटी ही साधारणत: जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणारी नवीन वर्षांची कसोटी मानली जाते. परंतू पूर्वनियोजित वेळापत्रकातून ती ७ जानेवारीला ठेवण्यात आली आहे.
या कार्यक्रमास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून अद्याप कोणतीही पुष्टी मिळू शकली नाही. वेळापत्रकानुसार, एकदिवसीय सामन्यांनंतर ४ ते ८ डिसेंबर दरम्यान अॅडलेडमध्ये तीन टी-२० सामने खेळले जातील आणि त्यानंतर चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू होईल. या कसोटीती सुरुवात ब्रिस्बेनऐवजी १७ डिसेंबरपासून अॅडलेडमध्ये सुरू होईल. या तारखेतील बदलामुळे बॉर्डर खुष नाहीत.
बॉर्डर म्हणाले, ''तडजोड केली पाहिजे असे मला वाटत नाही. कोरोनामुळे असे होत असेल, तर ठीक आहे. मात्र, बॉक्सिंग डे आणि न्यू इयर टेस्ट मॅच दरम्यान त्यांना थोडा वेळ हवा असेल तर हा मूर्खपणा आहे. आपण याचे आयोजन बर्याच वर्षांपासून करत आहोत. जर हे वेळापत्रक भारताच्या इच्छेमुळे बदलण्यात आले असेल, तर मी त्यात समाधानी नाही.''
ते म्हणाले, ''तो(भारत) स्वत: ला जागतिक क्रिकेटची ताकद मानतो. म्हणून तो गोष्टींमध्ये हस्तक्षेप करतो. परंतू या पारंपारिक तारखा आहेत, ज्याविषयी सर्वांना माहिती आहे. मी झुकणार नाही. आमच्याकडे पारंपारिक तारखा आहेत, त्या कायम ठेवा. ब्रिस्बेन कसोटी ही बर्याच वर्षांपासूनची पहिली कसोटी आहे. हे एक भव्य मैदान आहे. भारताला पहिला सामना ब्रिस्बेनमध्ये खेळायचा नाही, पण तसे होऊ नये."