नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज आकाश चोप्राने कसोटीचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला एकदिवसीय संघातून वगळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. चौथ्या क्रमांकावर सातत्यपूर्ण कामगिरी करूनही रहाणेला एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले नाही, असे आकाशने सांगितले.
भारतीय फलंदाजीच्या क्रमवारीत रहाणे हा चौथ्या क्रमांकावर योग्य फलंदाज असल्याचे आकाश म्हणाला. आकाशने यूट्यूब चॅनेलवर लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना रहाणेविषयी काही गोष्टी सांगितल्या. आकाश म्हणाला, ''चौथ्या क्रमांकासाठी रहाणेची आकडेवारी चांगली आहे. या क्रमांकावर फलंदाजी करताना जर आपण सातत्याने चांगली कामगिरी करत असाल, तुमचा स्ट्राइक रेटही 83च्या आसपास आहे, तर तुम्हाला आणखी संधी का मिळू नयेत?''