मुंबई - भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरशी घेतलेल्या पहिल्या भेटीची आठवण शेअर केली आहे. अजिंक्यने वयाच्या १४ वर्षी सचिनची भेट घेतली होती. सचिनने दिलेल्या वेळेपूर्वीच अजिंक्य तेथे दाखल झाला होता. आज २४ एप्रिलला सचिनचा ४७वा वाढदिवस आहे, त्यानिमित्त अजिंक्यने ही आढवण शेअर केली आहे.
इन्स्टाग्रामवर अजिंक्यने सचिनची आठवण काढली. त्याने इन्स्टाग्रामवरील व्हिडिओमध्ये म्हटले, की मी १४ वर्षांचा होतो आणि मी माझ्या प्रशिक्षकाला सांगितले, की मला सचिनला भेटायचे आहे. त्याने सचिनची परवानगी घेतली आणि सचिननेही ‘हो’ सांगितले. त्याने माझ्या प्रशिक्षकाला सांगितले, की रहाणेला संध्याकाळी साडेचार वाजता पाठवा.