मुंबई- कोरोना विषाणूच्या फैलावामुळे जवळपास संपूर्ण विश्व चिंतेत आहे. या विषाणूचा प्रसार जगभरातील १५० हून अधिक देशात झाला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या समस्येवर उपाययोजना करत आहे. विविध क्षेत्रातील नामवंत मंडळीही कोरोनाच्या जागृतीसाठी प्रयत्न करत आहेत. यात भारतीय क्रिकेट संघाचा मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणे ही पुढे सरसावला आहे. त्याने एका व्हिडिओ संदेशाद्वारे माहिती दिली आहे.
अजिंक्य आपल्या व्हिडिओमध्ये कोरोना कसा पळवून लावता येईल, याबाबतचे उपाय सांगताना दिसून येत आहे. तो म्हणतो, 'आपल्याला प्रशासनाला मदत करायला हवी. प्रशासन, पोलीस यंत्रणा, पालिका, वैद्यकीय अधिकारी जी गोष्ट आपल्याला म्हणतील, ते करायला हवे. या सर्वांना आपण सहकार्य करायला पाहिजे.'
जर तुम्हाला कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवायचे असेल, तर आपण आपले हात नियमितपणे धुतले पाहिजे. त्याचबरोबर आवश्यक असल्यास घराबाहेर पडावं. आपण प्रशासनाला सर्वतोपरी मदत करायला हवी, त्यांना सहकार्य करायला हवे. आपण जर त्यांना मदत केली, सहकार्य केले तर नक्कीच आपण यामधून लवकरच बाहेर पडू. पण त्यासाठी तुमचा सहभागही महत्वाचा आहे. आपण निराश न होता एकजुटीने या समस्येचा सामना करू आणि कोरोनाला दूर पळवून लावण्यात हातभार उचलू, असे आवाहन अजिंक्यने केले आहे.