रांची- दक्षिण आफ्रिकेविरुध्द तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेने दमदार शतकी खेळी केली. अखेरच्या कसोटीत कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आफ्रिकेच्या भेदक माऱ्यासमोर भारताची अवस्था ३ बाद ३९ अशी झाली होती. तेव्हा रोहित-अजिंक्य या जोडीने द्विशतकी शतकी भागिदारी रचत भारताला सुस्थितीत आणले.
यादरम्यान, अजिंक्य रहाणेने आपले कसोटी कार्यकिर्दीतील ११ वे शतक झळकावले. त्याने ५९.१७ च्या स्ट्राइकरेटने १६९ चेंडूत १४ चौकार आणि १ षटकाराच्या मदताने १०० धावा पूर्ण केल्या. अजिंक्यची रहाणे ११५ धावांवर बाद झाला.
आससीसी कसोटी क्रमवारीच्या यादीत टॉप १० मध्ये विराजमान असणाऱ्या अजिंक्यने २०१६ मध्ये शेवटची शतकी खेळी केली होती. त्यानंतर अजिंक्यला तब्बल ३ वर्षानंतर शतकी खेळी साकारता आली. २०१६ मध्ये अजिंक्यने न्यूझीलंडविरुध्द १८८ धावांची खेळी केली होती.