एंटिगा- भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवस अखेर भारताने 6 विकेट गमावून 203 धावा केल्या आहेत. हा सामना एंटिगाच्या विवियन रिचर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात असून वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.
फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. 25 धावांच्या आतच भारताने आघाडीचे फलंदाज गमावले. मयंक अग्रवाल 5 धावा तर चेतेश्वर पुजारा केवळ 2 धावा करत माघारी परतला. 7 धावांमध्ये दोन खेळाडू गमावल्यानंतर कर्णधार विराट कोहली फलंदाजीसाठी मैदानात आला. मात्र, त्यानेही निराशा केली. कोहली 9 धावा केल्यानंतर शैनन गेब्रियलच्या चेंडूवर बाद झाला.