मुंबई - ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक कसोटी मालिकेत, विजयाचा पताका रोवणारा भारतीय संघ तब्बल ५ महिन्यांनी, गुरूवारी (ता. २१) मायदेशी परतला. बॉर्डर-गावसकर मालिकेत विजय मिळवल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेचे मुंबईत ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यादरम्यान, मागील बरेच महिने घरापासून दूर असलेल्या अजिंक्यने घरी परतल्यानंतर सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
अजिंक्यने तिच्या मुलीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये अजिंक्यने लिहिले आहे की, '५ महिने, २ देश व ८ शहर फिरल्यानंतर माझ्या आवडत्या शहरात माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवायला मिळत आहे.'
दरम्यान, अजिंक्यची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी अजिंक्यला त्याच्या अभूतपूर्व कामगिरीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.