महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

अजिंक्य रहाणेने शेअर केला नन्ही परीसोबतचा 'क्युट' फोटो, पाहाच एकदा - Ajinkya Rahane daughter

अजिंक्यने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये, अजिंक्य पत्नी राधिका आणि मुलीसह दिसत आहे. आपल्या मुलीचा गोड चेहरा पाहून अजिंक्यच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. दरम्यान, भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने ट्विट करुन अजिंक्य रहाणे बाप झाल्याची गोड बातमी दिली होती.

अजिंक्य रहाणेने शेअर केला नन्ही परीसोबतचे 'क्युट' फोटो, पाहाच एकदा

By

Published : Oct 7, 2019, 5:35 PM IST

मुंबई- भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेची पत्नी राधिकाने शनिवारी एका गोंडस मुलीला जन्म दिला. रहाणे त्यावेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी विशाखापट्टणम येथे होता. यामुळे त्याला त्वरित मुलीची भेट घेता आली नव्हती. आफ्रिकेविरुध्दच्या कसोटी सामना जिंकल्यानंतर रहाणेने त्वरित मुंबई गाठले आणि 'नन्ही परी'ची भेट घेतली. आज सोमवारी त्याने आपल्या परीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अजिंक्यने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये, अजिंक्य पत्नी राधिका आणि मुलीसह दिसत आहे. आपल्या मुलीचा गोड चेहरा पाहून अजिंक्यच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. दरम्यान, भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने ट्विट करुन अजिंक्य रहाणे बाप झाल्याची गोड बातमी दिली होती.

अजिंक्य रहाणे पत्नी राधिका आणि मुलीसोबत....

अजिंक्य आणि राधिका धोपाळकर हे शाळेतील मित्र तसेच शेजारी होते. दोघेही सोबतच लहानाचे मोठे झाले. त्याच्या लहानपणांची मैत्रीचे रुपांतर शेवटी प्रेमात झाले. तेव्हा त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ते दोघेही २६ सप्टेंबर २०१४ मध्ये विवाहबध्द झाले.

हेही वाचा -#HBD ZAK : झहीर खान झाला ४१ वर्षांचा, वडिलांनी सांगितले होते अभियांत्रिकी सोडून क्रिकेट खेळ

हेही वाचा -IPL २०२० : केकेआरची 'चॅम्पियन'पदासाठी तयारी सुरू, 'हे' दोन दिग्गज खेळाडू घेतले संघात

ABOUT THE AUTHOR

...view details