कोलकाता - ईडन गार्डन्स येथे बांगलादेशविरूद्ध होणाऱ्या ऐतिहासिक डे-नाईट कसोटीपूर्वी भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये तो गुलाबी चेंडूसोबत झोपलेला दिसत आहे. 'मी आतापासून ऐतिहासिक 'पिंक' बॉल कसोटीचे स्वप्न पाहत आहे', असे रहाणेने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा -'माझ्या पोरांना सांभाळशील का?', रिषभ पंतला प्रश्न विचारणारा खेळाडू घेणार निवृत्ती?
या फोटोला विराट कोहली आणि शिखर धवन यांनी मजेशीररित्या ट्रोल केले आहे. विराट आणि धवनने दिलेली उत्तरे -
धवन आणि विराटने दिलेली उत्तरे
२२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान कोलकाता येथे दोन्ही संघांमध्ये 'पिंक बॉल' कसोटी सामना होणार आहे. कोलकातामधील 'ईडन गार्डन्स' येथे होणाऱ्या या सामन्यापूर्वी गुलाबी चेंडूने प्रशिक्षण घेणे आवश्यक असल्याचे मत कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त केले होते. 'मी खूप उत्साही आहे. हे एक नवीन आव्हान आहे. सामना कसा असेल हे मला माहीत नाही, परंतु प्रशिक्षण सत्राद्वारे आम्हाला याची कल्पना येईल. प्रशिक्षणानंतरच आम्हाला प्रत्येक सत्रात गुलाबी चेंडू किती फिरतो आणि कसा कार्य करतो याची कल्पना येईल. चाहत्यांच्या दृष्टीकोनातून ते मनोरंजक असेल', असे रहाणेने म्हटले होते.