महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

मराठमोळ्या अजिंक्यला पडतायेत गुलाबी स्वप्न, विराट-शिखरने केलं ट्रोल - भारताचा पहिला डे नाईट कसोटी सामना

अजिंक्य रहाणेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो गुलाबी चेंडूशेजारी झोपलेला दिसत आहे. अजिंक्यने या फोटोला 'ऐतिहासिक गुलाबी चेंडू आता स्वप्नातही येत आहे', असे कॅप्शन दिले आहे.

मराठमोळ्या अजिंक्यला पडतायेत गुलाबी स्वप्न, विराट-शिखरने केलं ट्रोल

By

Published : Nov 19, 2019, 4:30 PM IST

कोलकाता - भारत आणि बांगलादेश यांच्यात २२ नोव्हेंबरपासून ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. पहिल्यांदाच भारतात असा सामना खेळला जाणार असून या सामन्यासाठी खेळाडूंसह चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. या सामन्याआधी भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे एका फोटोमुळे चर्चेत आला आहे.

अजिंक्य रहाणेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो गुलाबी चेंडूशेजारी झोपलेला दिसत आहे. अजिंक्यने या फोटोला 'ऐतिहासिक गुलाबी चेंडू आता स्वप्नातही येत आहे', असे कॅप्शन दिले आहे.

अजिंक्यच्या या फोटोवर भारतीय कर्णधार विराट कोहली आणि शिखर धवन यांनी मजेशीर कमेंट दिल्या आहेत. या फोटोवर विराट कोहलीने 'मस्त पोज जिंक्सी' असा रिप्लाय दिला तर शिखरने, 'स्वप्नात कोणी फोटो काढला' असा मजेशीर सवाल केला आहे. २२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान रंगणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघ गुलाबी चेंडूसह सराव करत आहे.

हेही वाचा -कोलकाताने 'डच्चू' दिलेल्या लीनचं टी-१० लीगमध्ये तांडव, ३० चेंडूत ठोकल्या ९१ धावा

हेही वाचा -स्टोक्सच्या 'त्या' पुस्तकावरून आयपीएलच्या दोन संघांमध्ये भांडण!

ABOUT THE AUTHOR

...view details