महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

मराठमोळा अजिंक्य बनला 'बाप', पत्नी राधिकाने दिला गोंडस मुलीला जन्म - radhika dhopavkar

हरभजन सिंग याने, 'बाप बनलेल्या अजिंक्य रहाणेचे अभिनंदन...आशा आहे की आई आणि लहान बाळ व्यवस्थित असतील. आयुष्याचा सर्वात महत्वाच्या क्षणाची सुरुवात आता झाली आहे.' अशा आशयाचे मजकूर असलेला ट्विट केला आहे.

मराठमोळा अजिंक्य बनला 'बाप', पत्नी राधिकाने दिला गोंडस मुलीला जन्म

By

Published : Oct 5, 2019, 8:42 PM IST

विशाखापट्टणम- भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे दक्षिण आफ्रिकेविरुध्द सुरू असलेला कसोटी सामना खेळत आहे. चौथ्या दिवशीच्या खेळाला सुरूवात होण्यापूर्वी अजिंक्यला एक गोड भेट मिळाली आहे. त्यांची पत्नी राधिका हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून, अजिंक्य बाप बनला आहे. यामुळे सहकाऱ्यांसोबत भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग यानेही अंजिक्यला शुभेच्छा दिल्या आहेत.

हरभजन सिंग याने, 'बाप बनलेल्या अजिंक्य रहाणेचे अभिनंदन...आशा आहे की आई आणि लहान बाळ व्यवस्थित असतील. आयुष्याचा सर्वात महत्वाच्या क्षणाची सुरूवात आता झाली आहे.' अशा आशयाचे मजकूर असलेला ट्विट केला आहे.

अजिंक्य रहाणे आणि त्यांची पत्नी राधिका ही लहानपणांपासून चांगले मित्र आणि शेजारी होते. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी २६ नोव्हेंबर २०१४ ला लग्न केले. दरम्यान, अजिंक्य रहाणे सध्या दक्षिण आफ्रिकेविरुध्द तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे.

हेही वाचा -IND vs SA : रोहित शर्माचा 'हिट'शो, दोन्ही डावात शतक ठोकत पराक्रम

हेही वाचा -टीम इंडियाच्या 'या' स्टार खेळाडूवर पार पडली शस्त्रक्रिया, शेअर केला फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details