मुंबई - पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीची मुलगी अक्सा हिचा साखरपुडा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी याच्याशी होणार आहे. याची माहिती खुद्द शाहिद आफ्रिदीनेच दिली आहे. या दरम्यान, शाहिद आफ्रिदीचा एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाकिस्तान सुपर लीगमधील सामन्याचा आहे. यात शाहिद आफ्रिदी फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. तर त्याच्यासमोर गोलंदाज आहे, त्याचा होणारा जावई शाहिन शाह आफ्रिदी. सासरा-जावई यांच्यातील मजेशीर दंद्व यात अनुभवायास मिळत आहे.
शाहिनच्या षटकातील पहिल्या चेंडूवर शाहिद आफ्रिदीने जोरदार प्रहार करत षटकार ठोकला. यानंतर पुढच्या चेंडूवर शाहिनने शाहिद आफ्रिदीला क्लीन बोल्ड केलं. मात्र बाद केल्यानंतर त्याने शाहिदची विकेट एन्जॉय केली नाही. त्यामुळे युझर्सने या व्हिडिओला एक कॅप्शन देत म्हटलं की, 'शाहिनने शाहिदची विकेट सेलिब्रेट का केली नाही हे समजलं का?'