लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडूलकरने केला. सचिन हा १६ वर्षापूर्वीचा विक्रम मोडण्याची संधी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला होती. मात्र, केनला सचिनचा हा विक्रम मोडता आला नाही.
सचिनचा १६ वर्षापूर्वीचा 'विश्वविक्रम' कायम; केन विल्यमसननंतर जो रुटवर अपयशी
आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडूलकरने केला. सचिन हा १६ वर्षापूर्वीचा विक्रम मोडण्याची संधी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला होती. मात्र, केनला सचिनचा हा विक्रम मोडता आला नाही.
सचिन तेंडूलकरने २००३ साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत ६७३ धावा ठोकल्या होत्या. दरम्यान इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेत सचिनचा हा विक्रम मोडण्याची संधी रोहित शर्मा, डेव्हिड वार्नर आणि केन विल्यमसनला होती. रोहित शर्माने या स्पर्धेत ६४८ धावा केल्या मात्र, न्यूझीलंड विरुध्दच्या सामन्यात तो फक्त १ धाव काढून बाद झाला. या पराभवानंतर भारताचे आव्हान संपूष्टात आले. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात डेव्हिड वार्नरला संधी होती मात्र, त्यालाही हा विक्रम करता आला नाही. ऑस्ट्रेलियाही उपांत्य स्पर्धेत पराभूत झाला.
तेव्हा राहिला केन विल्यमसन त्याच्याकडे स्पर्धेचा शेवटचा अंतिम सामन्यात ही संधी होती. केनने हा विक्रम करण्यासाठी अंतिम सामन्यात १२६ धावांची गरज होती. मात्र, तो ३० धावांवर बाद झाला. दरम्यान, सचिनचा हा विक्रम मोडित काढण्याची संधी इंग्लंडचा खेळाडू जो रुटला होती. मात्र त्यालाही अंतिम सामन्यात हा विक्रम मोडता आला नाही. रुटला हा विक्रम मोडण्यासाठी १२५ धावांची गरज होती मात्र, रुट ७ धावांवर बाद झाला.