नवी दिल्ली -भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १२ मार्चपासून एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. तत्पूर्वी, आफ्रिकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज आणि आफ्रिका संघाच्या गोलंदाजीचा आधारस्तंभ कगिसो रबाडा भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकणार आहे.
हेही वाचा -Women t20 WC : भारताची गाडी सुसाट, श्रीलंकेला नमवले
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने रबाडाबद्दल अधिकृत माहिती दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या टी-२० मालिकेत रबाडाच्या मांड्यांना दुखापत झाली होती. त्याआधीही रबाडाला इंग्लंडविरुद्ध विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे रबाडाला चार आठवड्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
भारत वि. दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिका -
- पहिला सामना - १२ मार्च - धर्मशाळा
- दुसरा सामना - १५ मार्च - लखनऊ
- तिसरा सामना - १८ मार्च - कोलकाता