लखनऊ - अफगाणिस्तान विरुध्दची ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका वेस्ट इंडीजने ३-० ने जिंकली. तिसऱ्या व अखेरच्या सामन्यात शाय होपच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर विंडीजने अफगाणिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. शाय होपने नाबाद १०९ धावांची खेळी केली.
अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना, निर्धारीत ५० षटकात ७ बाद २४९ धावा केल्या. तेव्हा २५० धावांचे लक्ष विंडीजने ४८.४ षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. नाबाद शतकी खेळी करणारा विंडीजचा सलामीवीर शाय होपला सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. तर मालिकावीरचा पुरस्कार रोस्टन चेज याने पटकावला.