महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

AFG VS IRE TEST: अफगाणिस्तानच्या पहिल्या डावात 314 धावा - trail

अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यात प्रथमच कसोटी क्रिकेट खेळले जात असल्याने या लढतीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.

afghanistan

By

Published : Mar 16, 2019, 7:56 PM IST

Updated : Mar 16, 2019, 8:21 PM IST

देहरादून - अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने पहिल्या डावात ३१४ धावा केल्या आहेत. अफगाणकडून रहमत शाहने सर्वाधिक ९८ धावांची खेळी केली. तर हश्मतुल्लाहाने ६१ आणि कर्णधार असघर अफगाणने ६७ धावांची खेळी केली. या दोघांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर अफगाणिस्तानने ३०० धावांचा टप्पा पूर्ण केला.

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडचा पहिला डाव अवघ्या १७२ धावांवर आटोपला होता.

अफगाणिस्तानचा पहिल्या डाव ३१४ धावांवर संपल्यानंतर मैदानात आपला दुसरा डाव खेळण्यासाठी आलेल्या आयर्लंड संघाची सुरुवात निराशाजनक झाली. आयर्लंडचा कर्णधार आणि सलामी फलंदाज विल्यम पोर्टरफील्ड अवघ्या शून्य धावेवर माघारी परतला. दुसऱ्या दिवसअखेरीस आयरिश संघाची स्थिती १ बाद २२ अशी आहे.


Last Updated : Mar 16, 2019, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details