महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

अफगाणिस्तानचा पठाण' रशीद खानने केला क्रिकेट विश्वात कोणालाही न जमलेला विक्रम

बांगलादेश विरुध्द मैदानात संघाचे कर्णधारपद भूषवणारा रशीद खान हा कसोटी क्रिकेटमधील सर्वात तरुण कर्णधार ठरला आहे. रशीद याने वयाच्या २० व्या वर्षी कसोटी संघाचे नेतृत्व करत आहेत. याआधी जगातील कोणत्याही खेळाडूंना इतक्या तरुण वयात हा बहुमान कोणालाही मिळालेले नाही.

अफगाणिस्तानचा पठाण' रशीद खानने केला क्रिकेट विश्वात कोणालाही न जमलेला विक्रम

By

Published : Sep 5, 2019, 1:56 PM IST

ढाका - अफगाणिस्तान विरुध्द बांगलादेश या संघामध्ये एकमेव कसोटी सामना सुरू आहे. हा सामना बांगलादेशच्या चितगाव येथील मैदानावर रंगला असून अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खान याने या कसोटीसाठी मैदानावर पाय ठेवताच एक नवा इतिहास रचला आहे.

बांगलादेश विरुध्द मैदानात संघाचे कर्णधारपद भूषवणारा रशीद खान हा कसोटी क्रिकेटमधील सर्वात तरुण कर्णधार ठरला आहे. रशीद याने वयाच्या २० व्या वर्षी कसोटी संघाचे नेतृत्व करत आहेत. याआधी जगातील कोणत्याही खेळाडूंना इतक्या तरुण वयात हा बहुमान कोणालाही मिळालेले नाही.

Us Open २०१९ : सेरेना विल्यम्स नाबाद @१००

अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशीद खान याने आपल्या फिरकीच्या जोरावर विरोधी फलंदाजांना अनेकवेळा सतावले आहे. त्याने ३ कसोटी (बांगलादेश विरुध्द सुरु असलेला सामना धरून), ६७ एकदिवसीय आणि ३८ टी-२० सामने खेळली आहेत.

'शाबाश बेवडे, तुम नहीं सुधरोगे'... 'त्या' फोटोवरुन रवी शास्त्री ट्रोल

दरम्यान, आयसीसी विश्वकरंडक २०१९ मध्ये अफगाणिस्तान संघाची कामगिरी निराजनक ठरली. त्यानंतर संघाच्या नेतृत्वात बदल करण्यात आले आणि २० वर्षीय रशीद खानकडे संघाची धुरा देण्यात आली. रशीद एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० अशा तीनही प्रकारच्या क्रिकेट प्रकारात अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व करत आहे. याआधी विश्वकरंडक स्पर्धेत संघाचे नेतृत्व गुलबदीन नैब यांच्याकडे सोपवण्यात आले होते.

कसोटीमध्ये तरुण कर्णधार -

रशीद खान - २० वर्ष ३५० दिवस,

तदेंदा तायबू - २० वर्ष ३५८ दिवस,

नवाब अली खान पतौडी - २१ वर्ष ७७ दिवस

वकार यूनूस - २२ वर्ष १५ दिवस,

ग्रॅमी स्मिथ - २२ वर्ष ८२ दिवस,

शाकिब अल हसन - २२ वर्ष ११५ दिवस

ABOUT THE AUTHOR

...view details