महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

रहमत शाह ठरला अफगाणिस्तानचा पहिला 'शतकवीर' - चित्तगांव

चित्तगांव येथील जहूर अहमद चौधरी मैदानावर रंगलेल्या कसोटी सामन्यात रहमतने 186 चेंडूत 102 धावांची खेळी केली. यामध्ये 10 चौकार आणि 2 उत्तुंग षटकाराचा समावेश आहे. शतकानंतर लगेचच शाह बाद झाला. मात्र, त्याने ठोकलेले शतक हे अफगाणिस्तानसाठी स्पेशल ठरले आहे.

रहमत शाह याने ठोकले अफगाणिस्तानसाठी पहिले शतक, भारतासाठी 'या' खेळाडूने ठोकले आहे शतक

By

Published : Sep 5, 2019, 5:57 PM IST

ढाका - अफगाणिस्तान आणि बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अफगाणिस्तानच्या मधल्या फळीतील फलंदाज रहमत शाहने शतक ठोकले. कसोटीमध्ये शतकी खेळी करणारा शाह अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू ठरला आहे.

चित्तगांव येथील जहूर अहमद चौधरी मैदानावर रंगलेल्या कसोटी सामन्यात रहमतने 186 चेंडूत 102 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 10 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार लगावले. शतकानंतर लगेचच शाह बाद झाला. मात्र, त्याने ठोकलेले शतक हे अफगाणिस्तानसाठी स्पेशल ठरले आहे.

अफगाणिस्तानचा पठाण' रशीद खानने केला क्रिकेट विश्वात कोणालाही न जमलेला विक्रम

रहमत शाह याच्यापूर्वी कोणत्याही अफगाणी खेळाडूला कसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकता आलेले नाही. दरम्यान, अफगाणिस्तानचा हा तिसरा कसोटी सामना आहे. अफगाणिस्तानने यापूर्वी भारत आणि आयरलँड विरुध्द कसोटी सामना खेळला आहे. यात अफगाणिस्तानला भारताविरोधात पराभव स्वीकारावा लागला आहे. तर आयरलँड विरुध्द अफगाणिस्तानने विजय मिळवला आहे.

अॅशेस : व्वा छा गये गुरू.. पहा स्मिथचा जगावेगळा कव्हर ड्राइव्ह

देशासाठी सर्वात पहिले कसोटी शतक ठोकणारे फलंदाज -

  • ऑस्ट्रेलिया - चार्ल्स बॅनरमॅन
  • इंग्लंड - वीजी ग्रेस
  • दक्षिण आफ्रिका - जिम्मी सिनक्लेर
  • वेस्ट इंडीज - क्लिफोर्ड रोच
  • न्यूझीलंड - स्टीवा डेम्पस्टर
  • भारत - लाला अमरनाथ
  • पाकिस्तान - नझर मोहम्मद
  • श्रीलंका - सिदाथ वेटीमुनी
  • झिम्बाब्वे - डेव हॉग्टन
  • बांगलादेश - अमिनुल इस्लाम
  • आयरलँड - केविन ओ ब्रायन
  • अफगाणिस्तान - रहमत शाह

ABOUT THE AUTHOR

...view details