महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बांगलादेशची 'ती' रणनिती फ्लॉप.. अफगाणिस्तान पहिल्या कसोटी विजयाच्या उंबरठ्यावर - बांगलादेश

चित्तगावच्या जहूर अहेमद चौधरी मैदानात बांगलादेश विरुध्द अफगाणिस्तान या संघामध्ये एकमेव कसोटी सामना रंगला आहे. या सामन्यात नवखा अफगाणिस्तानचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशची अवस्था ६ गडी बाद १३६ अशी झाली आहे. उद्या (सोमवार) शेवटचा दिवस असून बांगलादेशचे फलंदाज किती काळ मैदानात तग धरुन राहतात हे पाहावे लागेल.

बांगलादेशला अतिशहाणपण नडले...अफगाणिस्तान पहिल्या कसोटी विजयाच्या उंबरठ्यावर

By

Published : Sep 8, 2019, 8:35 PM IST

ढाका- चित्तगावच्या जहूर अहेमद चौधरी मैदानात बांगलादेश विरुध्द अफगाणिस्तान या संघामध्ये एकमेव कसोटी सामना रंगला आहे. या सामन्यात नवखा अफगाणिस्तानचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशची अवस्था ६ गडी बाद १३६ अशी झाली आहे. बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी अजून २६२ धावांची आवश्यकता आहे. तर अफगाणिस्तानला सामना जिंकण्यासाठी ४ गडी बाद करावे लागणार आहे.

पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही कर्णधार राशिद खानने धारदार गोलंदाजी केली. यामुळे बांगलादेशचा संघ पराभवाच्या छायेत पोहोचला आहे. राशिदने दुसऱ्या डावात ३ गडी बाद करत यजमान बांगलादेशला अडचणीत आणले. मात्र तत्पूर्वी अफगाणिस्तानचा दुसरा डाव २६० धावांवर आटोपला. बांगलादेशकडून शाकीब अल हसनने ३ तर मेहदी हसन-तैजुल इस्लाम-नईम हसन यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.

बुमराह मैदानावर जादू घडवू शकतो, आफ्रिकन गोलंदाजाने केली स्तुती

अफगाणिस्तानने बांगलादेशाला विजयासाठी ३९८ धावांचे लक्ष ठेवले होते. याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली. झहीर खानच्या गोलंदाजीवर सलामीवीर लिटन दास माघारी परतला. त्यानंतर शदमान इस्लामने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या बाजूने ठराविक अंतराने फलंदाज बाद होत होते. शेवटी शदमानला मोहम्मद नबीने ४१ धावांवर बाद केले. यानंतर ठराविक अंतराने बांगलादेशचे फलंदाज बाद झाले.

अखेर शाकीब अल हसनने सौम्या सरकारच्या साथीने डाव सावरला आणि संघाला आणखी नुकसान होऊ दिले नाही. उद्या (सोमवार) शेवटचा दिवस असून बांगलादेशचे फलंदाज किती काळ मैदानात तग धरुन राहतात हे पाहावे लागेल.
दरम्यान, बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन आणि संघ व्यवस्थापनाने या कसोटी सामन्यात एकही वेगवान गोलंदाजाशिवाय उतरणे पसंद केले. याचा फटका बांगलादेशला बसला आहे.

संक्षिप्त धावफलक -

  • अफगाणिस्तानपहिला डाव सर्वबाद ३४२
  • बांगलादेश- पहिला डाव सर्वबाद २०५
  • अफगाणिस्तानदुसरा डाव - सर्वबाद २६०
  • बांगलादेशदुसरा डाव ४४.२ षटकात १३६/६

ABOUT THE AUTHOR

...view details