लखनौ -एकाना क्रिकेट स्टेडियम-बी मैदानावर खेळल्या गेलेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानच्या १९ वर्षांखालील संघाने भारताचा पराभव केला. या सामन्यात पाहुण्यांनी भारतावर २ गडी राखून विजय मिळवला. सामन्यात पराभव झाला असला तरी, टीम इंडियाने पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका ३-२ अशी जिंकली आहे.
अफगाणिस्तानचा टीम इंडियाला धक्का, २ गडी राखून मिळवला विजय - अफगाणिस्तानचा टीम इंडियाला धक्का न्यूज
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने १५७ धावा केल्या. अफगाणिस्तानने भारताचे हे आव्हान १५ चेंडू राखून पूर्ण केले. अफगाणिस्तानकडून आसिफ मुसाझाईने ४२, इम्रानने ३१, शफिकउल्ला गफारीने २५ आणि आरिफ खानने १६ धावांचे योगदान दिले. भारताकडून सुतरने तीन, हेगडेने दोन आणि कार्तिक त्यागी, बन्सल आणि भदोरियाने प्रत्येकी एक गडी बाद केला.

तत्पूर्वी, यजमान भारतीय संघ ४९.३ षटकांत १५७ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून व्हीएस भदोरियाने सर्वाधिक २९, कुशागराने २४, कर्णधार हेगडेने १७ आणि सौरभ डागरने १६ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून नूर अहमदने तीन, आबिद मोहम्मदी आणि शफिकउल्ला गफारी यांनी प्रत्येकी दोन, तर आरिफ खान आणि आसिफ मुसाजी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.