महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

फिरकीपटू मुजीब-उर-रहमानला कोरोना - मुजीब उर रहमान लेटेस्ट न्यूज

जोपर्यंत ब्रिस्बेन संघात सामील होण्याची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत मुजीब क्वीन्सलँड आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली राहील. बीबीएलचा दहावा हंगाम १० डिसेंबरपासून सुरू होत आहे.

Afghanistan spinner mujeeb ur rahman tests covid-19 positive
फिरकीपटू मुजीब-उर-रहमानला कोरोना

By

Published : Dec 4, 2020, 5:53 PM IST

ब्रिस्बेन - बिग बॅश लीगमध्ये (बीबीएल) ब्रिस्बेन हीटकडून खेळणारा अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीब-उर-रहमान कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे. कोरोनातून मुजीब सावरत असल्याची बातमी ब्रिस्बेन संघाने शुक्रवारी दिली. त्याला क्वीन्सलँडमधील हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे.

हेही वाचा -'सायकलवाले काका' लय भारी... वयाच्या एकाहत्तरीमध्ये पळवतात सुसाट सायकल!

जोपर्यंत ब्रिस्बेन संघात सामील होण्याची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत मुजीब क्वीन्सलँड आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली राहील. बीबीएलचा दहावा हंगाम १० डिसेंबरपासून सुरू होत आहे. क्लबने सांगितले, की "मुजीब आपल्या मायदेशी काबूलहून ऑस्ट्रेलियाला गेला. क्वारंटाइन कालावधीदरम्यान त्याला कोरोनाची लक्षणे जाणवली."

क्वीन्सलँडचे मुख्य कार्यकारी अधिकारी टेरी स्वेन्सन म्हणाले, की स्पर्धेची अखंडता व खेळाडूंचे आरोग्य योग्य राखण्यासाठी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांसमवेत काम करू. हे तरुण खेळाडू आहेत आणि आम्ही त्यांची काळजी घेतली जाईल.'' मुजीबचे हे यंदाचे तिसरे बीबीएल पर्व आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details