महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पाकिस्तानला जाणे पडले 'या' खेळाडूला भारी, झाले निलंबन - Afghanistan Cricket Board

मोहम्मद शहजाद सध्या पाकिस्तानच्या पेशावरमध्ये आहे. तो त्या ठिकाणी सराव करत आहे. मागील वर्षी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला इशारा दिला होता की, अफगाणिस्तानात कायमस्वरुपी राहून तिथेच सराव करावा, अन्यथा त्याचा करार रद्द करण्यात येईल. त्याने या नियमांचे पालन केलेले नाही. दरम्यान, शहजाद याचे बालपण पाकिस्तानच्या पेशावरमध्ये झाले आहे.

पाकिस्तानला जाणे पडले 'या' खेळाडूला भारी, झाले निलंबन

By

Published : Aug 11, 2019, 2:05 PM IST

काबुल - आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी, अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद शहजाद याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने ( एसीबी) जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे की, शहजादने देशातून बाहेर जाण्याच्या निर्णयाचे पालन केले नाही.

खेळाडूंनी देशाबाहेर जाण्यापूर्वी मंडळाची परवानगी घेणे बंधनकारक असते. या धोरणाचे पालन शहजाद याने केले नाही. याशिवाय जुलैमधील २० आणि २५ या दोन तारखांना शिस्तपालन समितीसमोर सुनावणीसाठी उपस्थित राहावे, असे समन्स त्याला बजावण्यात आले होते. त्याकडेही त्याने दुर्लक्ष केले. यामुळे एसीबीने त्यावर कारवाई म्हणून त्याचे करार रद्द करत निलंबन केले आहे.

काय केले शहजाद याने -
मोहम्मद शहजाद सद्या पाकिस्तानच्या पेशावरमध्ये आहे. तो त्या ठिकाणी सराव करत आहे. मागील वर्षी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला इशारा दिला होता की, अफगाणिस्तानात कायमस्वरुपी राहून तिथेच सराव करावा, अन्यथा त्याचा करार रद्द करण्यात येईल. त्याने या नियमांचे पालन केलेले नाही. दरम्यान, शहजाद याचे बालपण पाकिस्तानच्या पेशावरमध्ये झाले आहे.

आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान, दुखापत झाली असे सांगून एसीबीने शहजादला परत अफगणिस्तानला पाठवले होते. मात्र, मी फीट असताना, कर्णधार आणि संघाच्या व्यवस्थापकांनी मला अनफीट ठरवले असल्याचा आरोप शहजाद याने केला होता. चुकीच्या पध्दतीने आपल्याला संघातून वगळण्यात आले असल्याचेही तो म्हणाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details