नवी दिल्ली -अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने रहमतुल्ला कुरेशी यांना नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्त केले आहे. रहमतुल्ला यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नजीम जार अब्दुलरहमानझाई यांचे स्थान घेतले केले. लुतफुल्लाह स्टॅनिकझाई यांना काढून टाकल्यानंतर नजीम यांना सीईओ बनवण्यात आले. लुतफुल्लाह यांच्यावर गैरकारभार आणि गैरवर्तन केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून नव्या सीईओची नियुक्ती - अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड लेटेस्ट न्यूज
सोमवारी रहमतुल्ला यांनी अधिकृतपणे पदाची सूत्रे हाती घेतली. कुरेशी यांच्याकडे २२ वर्षांचा प्रशासकीय अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी जागतिक बँक आणि संयुक्त राष्ट्रांसह अनेक बहुराष्ट्रीय संस्था आणि कंपन्यांमध्ये काम केले आहे.

तत्पूर्वी, माजी कर्णधार रईस अहमदझाई यांना इंग्लंडच्या अँडी मोल्स यांच्या जागी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (एसीबी) संचालकपदी नियुक्त करण्यात आले होते. या पदामुळे मोल्स यांना दुहेरी जबाबदारीपासून मुक्त केले जाईल. मोल्स यांची गेल्या वर्षी क्रिकेट संचालक आणि मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.