नागपूर - मालिकेत १-०ने मागे असलेला ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जोरदार मुसंडी मारेल असा विश्वास ऑस्ट्रेलिया संघाचा गोलंदाज अॅडम झाम्पाने व्यक्त केला आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामान्यपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत तो बोलत होता.
दुसऱ्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलिया कमबॅक करेल- ऍडम झांम्पा - comeback
दुसऱ्या सामन्यात जोरदार मुसंडी मारेल असा विश्वास ऑस्ट्रेलिया संघाचा गोलंदाज अॅडम झाम्पाने व्यक्त केला
झाम्पा म्हणाला, की भारताचा संघ बलाढ्य आहे. फलंदाजीत भारताकडे सर्वोत्तम बॅट्समन असल्याने त्यांना बाद करणे अत्यंत कठीण असल्याचे तो म्हणाला. झाम्पाने ९सामन्यात ५वेळा विराट कोहलीला तंबूचा रास्ता दाखवलेला आहे.
रोज नवा दिवस नवा सामना असतो त्यामुळे उद्याच्या सामन्यात काय घडेल हे आता सांगणे कठीण आहे. सिरीजमध्ये १-०ने मागे असलो तरी ऑस्ट्रेलियाचा संघ बाऊन्स बॅक म्हणजेच पुनरागमन करण्यात पटाईत असल्याने आम्ही आमच्या नावाला साजेसा खेळ दाखवू. भारताचा विजयरथ नागपुरात रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल, असा विश्वास झाम्पाने व्यक्त केला आहे.