महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

केएल राहुलसोबत 'डेट' विषयावर निधी अग्रवालने सोडलं मौन; म्हणाली होय, आम्ही भेटलो... - केएल राहुलच्या रिलेशनविषयी निधीन सांगितलं

राहुलसोबतच्या डेट विषयी चर्चेवर निधीने सांगितले की, 'मी राहुलला ओळखते. मात्र, आम्ही दोघे सोबत कोठेही गेलेलो नाही. २०१९ विश्वकरंडक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. तेव्हा मी लंडनमध्ये होते. त्यामुळे मी टीम इंडियाच्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते.'

केएल राहुलसोबत 'डेट' निधी अग्रवालने सोडलं मौन; म्हणाली होय, आम्ही भेटलो...

By

Published : Oct 20, 2019, 2:30 PM IST

नवी दिल्ली - टीम इंडियाचा फलंदाज केएल राहुल आणि बॉलीवूडची अभिनेत्री निधी अग्रवाल यांच्यात रिलेशनशीप सुरू असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. काही मीडियांनी तर दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे वृत्तही दिले आहे. याविषयावर निधी अग्रवालने पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.

राहुलसोबतच्या डेट विषयी चर्चेवर निधीने सांगितले की, 'मी राहुलला ओळखते. मात्र, आम्ही दोघे सोबत कोठेही गेलेलो नाही. २०१९ विश्वकरंडक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. तेव्हा मी लंडनमध्ये होते. त्यामुळे मी टीम इंडियाच्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते.'

मात्र, आम्ही एकमेकांना डेट करत आहोत या निव्वळ अफवा आहेत. मी आणि राहुल चांगले मित्र आहोत, अशी कबुली निधीने दिली आहे. निधी अग्रवालने २०१७ मध्ये मुन्ना मायकल या चित्रपटाव्दारे बॉडीवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, या चित्रपटात टायगर श्राफ असूनही बॉक्स ऑफिसवर कमाई करु शकला नाही. दरम्यान, निधीने बॉलीवूडसोबत टॉलीवूडमध्येही अभिनय केला आहे.

निधी अग्रवाल नेहमी इन्स्टाग्रामवर अॅक्टिव असते. ती आपल्या अकांउटवरुन फोटो शेअर करत नेहमी चर्चेत असते. तर सध्या केएल राहुल खराब फॉर्ममुळे संघाबाहेर आहे.

हेही वाचा -VIDEO : विजयी जल्लोष करताना, प्रियकरानं केलं 'प्रपोज'..पुढं काय झालं वाचा

हेही वाचा -रोहितच्या दमदार प्रदर्शनाने, 'या' दोन खेळाडूंची कसोटी कारकिर्द धोक्यात

ABOUT THE AUTHOR

...view details