आबुधाबी - नॉर्दर्न वॉरियर्सने आबुधाबी टी-१० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिल्ली बुल्सचा ८ गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. वॉरियर्सने गोलंदाजीच्या जोरावर हा सामना जिंकला.
श्रीलंकेचा फिरकीपटू महिश थिकशाना ३, धनंजय लक्ष्मण आणि संयुक्त अरब अमिरातचा गोलंदाज जुनैद सिद्दीकीने प्रत्येकी २ गडी बाद केले. वॉरियर्सच्या अचूक गोलंदाजीमुळे दिल्ली बुल्सच्या संघाला ९ बाद ८१ धावांपर्यंत मजल मारता आली. बुल्सचे तीन फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले.
बुल्सने दिलेले ८२ धावांचे आव्हान वॉरियर्सनी २ गड्याच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. सलामीवीर वसीम मोहम्मद (२७), वेस्ट इंडीजचा खेळाडू निकोलस पूरन (१२), लेडींल सिमन्स (नाबाद १४) आणि रोवमॅन पॉवेलने नाबाद १६ धावा केल्या.