महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'या' महिन्यात खेळवली जाणार अबू धाबी टी-10 लीग - Abu dhabi t10 league month news

लीगच्या 2019 च्या हंगामात 1,24,000 चाहत्यांनी संपूर्ण 10 दिवस झायेद क्रिकेट स्टेडियमवर उपस्थिती नोंदवली होती. या स्पर्धेत अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होतात.

Abu dhabi t10 league will start from november
'या' महिन्यात खेळवली जाणार अबू धाबी टी-10 लीग

By

Published : May 5, 2020, 7:55 AM IST

दुबई - अबू धाबी टी-10 लीगचा पुढील हंगाम 19 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये खेळवला जाईल. लीगच्या यंदाच्या हंगामात पुन्हा एकदा अ‍ॅल्डर प्रॉपर्टीज प्रायोजित असतील तर, पर्यटन विभाग, अबुधाबी स्पोर्ट्स काउन्सिल यांच्यासमवेत अबू धाबी क्रिकेट हे यजमान असतील.

लीगच्या 2019 च्या हंगामात 1,24,000 चाहत्यांनी संपूर्ण 10 दिवस झायेद क्रिकेट स्टेडियमवर उपस्थिती नोंदवली होती. या स्पर्धेत अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होतात.

शासकीय अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर ही लीग आयोजित केली जाईल. कोरोनामुळे सध्या सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details