नवी दिल्ली - हार्दिक पांड्यापाठोपाठ भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा सलामीवीर अभिनव मुकुंदही बाबा बनला आहे. शनिवारी अभिनव आणि त्याची पत्नी आरभी यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. अभिनवने एक ट्विट करत ही गोड बातमी आपल्या चाहत्यांशी शेअर केली आहे.
हार्दिक पांड्यानंतर भारताचा ‘हा’ सलामीवीर बनला बाप - abhinav mukund latest news
मुकुंदने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'आरभी आणि माझ्या आयुष्यातील हा एक महत्वाचा दिवस असून आमच्या आयुष्याला आता एक नवे वळण लागले आहे. आई-बाबा या नात्याचा आमचा प्रवास सुरु झाला असून आज आमच्या घरात मुलगा जन्माला आला आहे. अभिनवला मुलगा झाल्याची माहिती मिळाल्यावर चेन्नई सुपर किंग्स संघाने आणि रविचंद्रन अश्विन यांनी मुकुंद दांपत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
मुकुंदने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''आरभी आणि माझ्या आयुष्यातील हा एक महत्वाचा दिवस असून आमच्या आयुष्याला आता एक नवे वळण लागले आहे. आई-बाबा या नात्याचा आमचा प्रवास सुरु झाला असून आज आमच्या घरात मुलगा जन्माला आला आहे.'' अभिनवला मुलगा झाल्याची माहिती मिळाल्यावर चेन्नई सुपर किंग्स संघाने आणि रविचंद्रन अश्विन यांनी मुकुंद दांपत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनव मुकुंदने आजवर 7 कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याने 320 धावा केल्या आहेत. तामिळनाडूकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळताना अभिनवने आपली वेगळी छाप सोडत जवळपास 10 हजारपेक्षा अधिक धावा केल्या आहेत.