लाहोर - लग्नानंतरही आपले पाच ते सहा महिलांशी विवाहबाह्य संबंध होते. असा खुलासा पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाकने केला. एका पाकिस्तानी टीव्ही शोमध्ये बोलताना रझाकने हा खुलासा केला आहे. त्याच्या या खुलाशामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे.
लग्नानंतरही माझे पाच-सहा महिलांशी संबंध होते, पाकच्या माजी अष्टपैलू खेळाडूचा खुलासा - अष्टपैलू खेळाडू
पाकिस्तानच्या एका टीव्ही शो मध्ये अब्दुल रझाक सहभागी झाला होता. या शोमध्ये त्याला व्यक्तीगत जीवनाविषयी विचारण्यात आले, तेव्हा रझाक म्हणाला, माझे महिलांशी संबंध होते. काही प्रकरणे एक वर्षभर चालायची तर काही दीड वर्ष टिकायची. असे त्याने सांगितले. तेव्हा यावर शोच्या अँकरने ही प्रेमप्रकरणे लग्नाआधी होती का नंतर असे विचारले असता रझाक म्हणाला, लग्नानंतरही होती.
पाकिस्तानच्या एका टीव्ही शोमध्ये अब्दुल रझाक सहभागी झाला होता. या शोमध्ये त्याला व्यक्तीगत जीवनाविषयी विचारण्यात आले, तेव्हा रझाक म्हणाला, माझे महिलांशी संबंध होते. काही प्रकरणे एक वर्षभर चालायची तर काही दीड वर्ष टिकायची, असे त्याने सांगितले. तेव्हा यावर शोच्या अँकरने ही प्रेमप्रकरणे लग्नाआधी होती का नंतर असे विचारले असता रझाक म्हणाला, लग्नानंतरही होती.
अब्दुल रझाक पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू असून त्याने पाककडून २६५ एकदिवसीय सामने खेळली आहे. यामध्ये त्याने तीन शतके आणि २३ अर्धशतके ठोकली आहेत. तसेच त्याने गोलंदाजीत २६९ गडी बाद केले आहेत. दरम्यान, यापूर्वी अब्दुल रझाकचे टॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाशी प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा होती. तसेच तो काही दिवासांपूर्वी हार्दिक पांड्याची स्तुती करत आपल्या ट्रेनिंगने तो जगातील सर्वोत्तम खेळाडू करु असे सांगितले होते. यामुळेही तो चर्चेत आला होता.