महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पाकचा अब्दूल रज्जाक म्हणतो पांड्याला माझ्याकडे पाठवा... तर नेटीझन्स म्हणतात विजय शंकरला घेऊन जा... - hardik pandya

अब्दूल रज्जाकच्या या वक्तव्यावर नेटीझन्सनी त्याला धारेवर घेतले आहे.

पाकचा अब्दूल रज्जाक म्हणतो पांड्याला माझ्याकडे पाठवा... तर नेटीझन्स म्हणतात विजय शंकरला घेऊन जा...

By

Published : Jun 28, 2019, 3:39 PM IST

मँचेस्टर - विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाचा धावांनी पराभव करत विजयी मालिका कायम ठेवली आहे. या सामन्याच्या डावाच्या शेवटी हार्दिक पांड्याने केलेल्या ४६ धावांमुळे भारताला चांगली धावसंख्या गाठता आली. पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दूल रज्जाक याने पांड्याबद्दल एक वक्तव्य केले आहे. आणि त्याची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

अब्दूल रज्जाकने म्हटले आहे, 'मला दोन आठवडे द्या. मी हार्दिक पांड्याला जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू बनवून दाखवतो.' रज्जाकने पांड्याच्या खेळण्यातील उणिवा दाखवून त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अब्दूल रज्जाकच्या या वक्तव्यावर नेटीझन्सनी त्याला धारेवर घेतले आहे. काहींनी तर 'विजय शंकरला घेऊन जा' असेही म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details