लंडन -क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर एबी डिव्हिलियर्सचा धमाका पाहायला मिळाला. या मैदानावर सुरु असलेल्या टी-20 ब्लास्ट स्पर्धेच्या पदार्पणात डिव्हिलियर्सने मिडलसेक्स संघाकडून अर्धशतक झळकावले.
आफ्रिकेतून निवृत्त झालेल्या एबी डिव्हिलियर्सचे पदार्पणात अर्धशतक - Middlesex
दक्षिण आफ्रिकेतून निवृत्त झालेल्या एबी डिव्हिलियर्सने 43 चेंडूत 88 धावांची दमदार खेळी केली.
आफ्रिकेतून निवृत्त झालेल्या एबी डिव्हिलियर्सचे पदार्पणात अर्धशतक
दक्षिण आफ्रिकेतून निवृत्त झालेल्या एबी डिव्हिलियर्सने 43 चेंडूत 88 धावांची दमदार खेळी केली. या खेळीत डिव्हिलियर्सने एसेक्स संघाविरुद्ध खेळताना 6 षटकार आणि 5 चौकार लगावले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 164 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करत असताना मिडलसेक्स संघाने 7 विकेट्स गमावल्या खऱ्या पण 17 षटकात आव्हान पूर्ण केले. आयपीएल स्पर्धेनंतर प्रथमच डिव्हिलियर्स मैदानात उतरला होता.