मुंबई- दक्षिण आफ्रिकेचा माजी धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलिअर्सने पाकिस्तान सुपर लीगमधून (पीएसएल) माघार घेतली आहे. पाठीच्या दुखण्यामुळे डिव्हिलिअर्सने पीएसएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. डिव्हिलिअर्स पीएसएलमध्ये लाहोर कलंदर्स संघाचे कर्णधारपद सांभाळत होता.
एबी डिव्हिलिअर्सची पाकिस्तान सुपर लीगमधून माघार, जाणून 'घ्या' कारण - पाकिस्तान
ठीच्या दुखण्यामुळे डिव्हिलिअर्सने पीएसएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. डिव्हिलिअर्स पीएसएलमध्ये लाहोर कलंदर्स संघाचे कर्णधारपद सांभाळत होता.
डिव्हिलिअर्स म्हणाला, की पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांसमोर प्रदर्शन करू शकणार नाही, याबद्दल वाईट वाटत आहे. माझ्या डॉक्टरांनी मला २ आठवडे आराम करण्यास सांगितले आहे, त्यामुळे मी पाकिस्तानात खेळू शकणार नाही. आशा करतो, की पुढीलवर्षी मला पीएसएलमध्ये खेळायला मिळेल. लाहोर कलंदर्सच्या संघाने यावर्षी विजेतेपद पटकवावे यासाठी मी त्यांना शुभकामना देतो.
डिव्हिलिअर्सला यावर्षी लाहोरसाठी युनायटेड अरब अमीराती येथे ७ सामने आणि लाहोर येथे २ सामने खेळायचे होते. डिव्हिलिअर्स युएई येथे झालेल्या सामन्यानंतर दक्षिण आफ्रिकेला परतला होता. यानंतर तो पाकिस्तानला माघारी जाणार अशा बातम्या समोर येत होत्या. परंतु, आता दुखापतीमुळे त्याने पीएसएलमधून माघार घेण्याचे ठरवले आहे.