लंडन -दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज अब्राहम डिव्हिलियर्स पहिल्यांदा मला भेटला तेव्हा त्याने मला न्यूझीलंडचा क्रिकेटपटू मानले होते, असे जोस बटलरने सांगितले आहे. इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज बटलर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. या संघाच्या सोशल मीडियावर पार पडलेल्या कार्यक्रमादरम्यान बटलरने हा खुलासा केला.
बटलर म्हणाला, "मी लहान असल्यापासून डिव्हिलियर्स हा माझा आदर्श आहे. मला त्याचा खेळ आवडतो. तो खरोखरच आश्चर्यकारक आहे. आयपीएलच्या वेळी जेव्हा मी मुंबई इंडियन्सकडून खेळायचो, तेव्हा डिव्हिलियर्सची थोडीशी ओळख झाली. सामना संपल्यानंतर तो माझ्याबरोबर बिअर पिणार होता.''