नवी दिल्ली -रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्सने आयपीएल कारकीर्दीत मोठा पराक्रम रचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा महत्वाचा क्रिकेटपटू असलेल्या डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये ४५०० धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो सहावा फलंदाज ठरला आहे. या विक्रमात त्याने डेव्हिड वॉर्नरनंतर स्थान मिळवले आहे.
मिस्टर '३६०' डिग्रीची मुंबईविरुद्धच्या सामन्यात 'रॉयल' कामगिरी - एबी डिव्हिलियर्स आयपीएल विक्रम
मुंबई विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात एबीने आपल्या आयपीएल कारकिर्दीच्या ४५०० धावा पूर्ण केल्या. त्याच्याआधी विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवन यांनी ही कामगिरी नोंदवली आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मुंबई विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात एबीने हे स्थान मिळवले. त्याच्याआधी विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवन यांनी ही कामगिरी नोंदवली. एबीने १५७ सामने खेळल्यानंतर ४ हजार ५२९ धावा केल्या आहेत. तो ९ वर्षे आरसीबीकडून खेळतो आहे. सोमवारी मुंबईविरुद्ध झालेल्या सामन्यात वेगवान ५५ धावा केल्या. त्याच्या खेळीत ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.
एबीने २००८पासून आयपीएल खेळण्यास सुरुवात केली. प्रथम तो दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून तीन वर्षे खेळला आणि २०११पासून तो बंगळुरू संघात आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात काल (सोमवार) दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियममध्ये लढत झाली. अत्यंत चुरशीची ठरलेल्या लढतीत आरसीबीने सुपर ओव्हरमध्ये बाजी मारली.