मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच आई होणार आहे. ती सद्या दुबईमध्ये तिचा पती क्रिकेटर विराट कोहलीसोबत क्वालिटी टाइम घालवत आहेत. तर, विराट सद्या आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करत आहे. अनुष्का त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी मैदानावर उपस्थित राहत आहे. यादरम्यान, अनुष्का आणि विराटचा एक रोमाँटिक फोटो व्हायरल झाला आहे. महत्वाचे म्हणजे, हा फोटो एका प्रसिद्ध क्रिकेटर टिपला आहे.
विराट कोहली आणि तिची पत्नी अनुष्का शर्मा दुबईच्या अटलांटिक द पाम रिसॉर्टमध्ये पाण्यात मस्ती करत होते. तेव्हा रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्सने त्या दोघांचा फोटो टिपला. हा फोटो सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विराटने हा फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन देखील शेअर केला आहे. तसेच त्याने या फोटोचे क्रेडिट डिव्हिलियर्सला दिले आहे. यावर अनेकांनी लाइक, कमेंटचा वर्षाव केला आहे. तर काहींनी डिव्हिलियर्स तिथे काय करत होता? असा प्रश्न उपस्थित केला आहे.